मनसुख हिरेन हत्येचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलसह दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला कॉन्स्टेबल हा बडतर्फ पोलीस असून दुसरा हा क्रिकेट बुकी असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील ही पहिली अटक असून ठाणे पोलीस दलातील एक अधिकारी एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
हवालदाराला लखनभैय्या बनावट चकमकप्रकणातील शिक्षा झालेली!
विनायक शिंदे (५५) असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून नरेश दारे (३१) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल हा बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबल असून लखनभैय्या बनावट चकमकप्रकणातील गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली असून तो या संचित रजेवर बाहेर आलेला होता. तसेच नरेश दारे हा क्रिकेट बुकी असून दोघेही ठाण्यात राहणारे आहेत. या गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा : लेटरबॉम्बनंतर महाआघाडीचे मंत्री भूमिगत!)
या गुन्ह्यात अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले!
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर खाडीत मृतदेह मिळून आला होता. या प्रकरणात एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आली होता. या गुन्ह्यात एटीएसने मुंबई आणि ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्याची देखील चौकशी केली आहे. तसेच या गुन्ह्यात अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. एटीएसच्या हाती लागलेल्या सबळ पुराव्यावरून एटीएसने शनिवारी विनायक शिंदे आणि नरेश दारे या दोघाना ताब्यात घेऊन रात्री उशिरा दोघांना अटक करण्यात आली. या दोघांचा आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community