दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्याच्या नूतनीकरणाचे आता कॅग ऑडिट करणार आहे. या लेखापरीक्षणात सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणातील अनियमितता आणि उल्लंघनाची विशेष चौकशी होणार आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ६, फ्लॅग स्टाफ रोड, सिव्हिल लाइन्स, दिल्ली येथील अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणात प्रशासकीय आणि आर्थिक अनियमिततेचे विशेष ऑडिट करतील. यासंदर्भात केंद्राने कॅगला केलेल्या विनंतीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
२४ मे २०२३ रोजी एलजी सचिवालयाच्या शिफारशीनंतर गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. २४ मे रोजी, एलजी कार्यालयाने केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्याच्या नूतनीकरणाशी संबंधित खर्चाशी संबंधित प्रकरणावर कॅगद्वारे विशेष ऑडिट करण्याची शिफारस केली होती. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणात आर्थिक अनियमितता झाल्याची चर्चा होती.
(हेही वाचा – राष्ट्रवादीचा ७०,००० कोटींचा घोटाळा असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल)
सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणाच्या नावाखाली खूप पैसा खर्च करण्यात आल्याचे एलजीने आपल्या पत्रात लिहिले आहे. देशात कोविड-१९ महामारी शिखरावर पोहोचलेली असताना हे सर्व केले जात होते. कोविडच्या कठीण काळातही दिल्लीचे मुख्यमंत्री आपल्या घराची शोभा वाढवण्यात मग्न होते. गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रभारी मंत्र्यांच्या संगनमताने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली केलेल्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community