मागील शनिवारपासून आगमन झालेल्या पावसामुळे आता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता थेंबे थेंबे पाणी जमा होऊ लागले आहे. त्यामुळे २६ जून २०२३ रोजी या सर्व धरणांमध्ये नियमित पाणी साठ्यासोबत राखीव साठा अशाप्रकारे एकूण पाणी साठ्याची पातळी १२.११ टक्क्यांवर आली होती, ती पाण्याची पातळी २७ जून २०२३ च्या सकाळी १२.२५ एवढी झाली होती. त्यामुळे तलाव क्षेत्रांमध्ये पाऊस पडून पाण्याची पातळीत वाढ होत असल्याने मुंबईकरांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलावांमधून दरदिवशी ३८५० दशलक्ष लिटर अर्थात ३८५ कोटी लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासर्व तलावांमधील नियमित पाणी साठा ७ टक्क्यांपर्यंत आल्यानंतरही राखीव साठ्यातील पाणी उचलण्यास परवानगी मिळाल्याने त्या पाण्याचा साठा उपलब्ध होता. परंतु नियमित पाणी साठ्यातील पाणी उपलब्ध असल्याने महापालिकेला भातसाच्या राखीव पाणी साठ्याला हात लावण्याची गरज भासली नाही.
(हेही वाचा – पुन्हा पंतप्रधान स्वनिधीचा लाभ : फेरीवाले म्हणतात, कारवाई आधी थांबवा)
मात्र, शनिवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता तलाव तथा धरण क्षेत्रांमध्ये पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे थेंबे थेंबे साचू लागले असून यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळीत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. २६ जून रोजी नियमित पाणी साठा आणि राखीव साठा अशाप्रकारे एकूण १२.११ टक्के एवढा साठा होता, तर २७ जून रोजी हा एकूण साठा १२.२५ टक्के एवढा झाल्याचे दिसून आले.
२७ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२.२५ टक्के
२६ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२.०२ टक्के
२५ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२.११ टक्के
२४ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२.३९ टक्के
२३ जून २०२३ : एकूण पाणी साठा १२. ७३ टक्के
२१ जून २०२३ : एकूण पाणी साठा १३.३८ टक्के
हेही पहा –
Join Our WhatsApp Community