Mumbai Airport : मुंबई विमानतळ परिसरात फुगे, पतंग, फटाके उडवण्यास २१ ऑगस्टपर्यंत बंदी

189
Mumbai Airport : मुंबई विमानतळ परिसरात फुगे, पतंग, फटाके उडवण्यास २१ ऑगस्टपर्यंत बंदी
Mumbai Airport : मुंबई विमानतळ परिसरात फुगे, पतंग, फटाके उडवण्यास २१ ऑगस्टपर्यंत बंदी

मुंबई विमानतळ परिसरात फुगे, पतंग, फटाके उडवण्यास २१ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्ट्यांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू, पतंग आदींमुळे विमानांचे सुरक्षित अवागमन धोक्यात येते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे उपायुक्त विशाल ठाकूर म्हणाले.

(हेही वाचा – Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे कॅग ऑडिट करणार)

कोणत्याही विमानाच्या लँडिंग, टेक ऑफ आणि अवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.