Eknath Shinde : १५ वर्ष मुंबईला ओरबाडले! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका

254
CM Eknath Shinde : त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
CM Eknath Shinde : त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबईवर गेली १५ वर्षे सत्ता असताना तुम्ही मुंबईला ओरबाडून काढले, मुंबईची लूट केली. आता हिशेब द्यायची वेळ आल्यावर मोर्चे काढले जात आहेत. पण जनता या नाटकीपणाला फसणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली. खरे तर मुंबईकरांना इतकी वर्षे लुटल्यामुळे तुमच्याच घरांवर मोर्चा काढायला हवा आहे, असेही शिंदे यांनी ठणकावले.

मुंबईतील माजी नगरसेवक संजय अगलदरे यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी १ जुलैच्या मोर्चावरून ठाकरे गटावर जोरदार टीका केली. राज्यात बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत थांबलेली, थांबवलेली विकासकामे मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकत आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

(हेही वाचा – Thackeray Govt : ठाकरे सरकारचा फॉर्म्युला वापरुन तोडणार शाखांमधील अनधिकृत बांधकाम?)

आमचे सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील रस्ते क्रॉंकिटीकरणाचा निर्णय घेतला. हा निर्णय १५ वर्षांपूर्वी घेऊन काम केले असते तर मुंबई महापालिकेची साडेतीन हजार कोटींची बचत झाली असती. गेल्या सरकारच्या काळात मेट्रो आणि कारशेड प्रकल्प अडीच वर्षात पूर्णपणे ठप्प होते. रस्त्यांची कामे, क्रॉंक्रिटीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशी विविध लोकाभिमुख कामे पूर्ण व्हायला हवी होती. मात्र संधी असूनही ही कामे ठप्प होती.

कोविड काळातल्या गैरकारभाराची ईडी चौकशी करत आहे. कोविडमध्ये माणसे मरत होती, मात्र त्यावेळी काही जण केवळ पैसा कमावण्यात लागले होते. तीच मंडळी आता आम्हाला प्रश्न करत आहेत हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डांटे अशी परिस्थिती आहे, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले. लोकशाहीत निवडणुका लढवायची सर्वांना मुभा असते. मते द्यायचा अधिकार मतदारांना असतो. तेलंगणाचे मुख्यमंत्री के, चंद्रशेखर राव यांनी आधी त्यांचे राज्य, पक्ष सांभाळावा. त्यांच्या राज्यातील नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत, असेही शिंदे यांनी राव यांना सुनावले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.