गोरेगाव नेस्कोमध्ये उभारण्यात आलेल्या समर्पित आरोग्य केंद्राचे काम विकासक रोमेल बिल्डर यांना विनानिविदा देण्यात आले. रोमेल बिल्डर कंपनीला विनानिविदा दहा कोटींचे काम बहाल केले. परंतु याबाबतची तक्रार केल्यानंतरही आयुक्तांकडून दखल न घेतल्याने भाजपचे आमदार अमित साटम यांनी जुलै २०२०मध्ये लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे अमित साटम यांनी चौकशी करून संबंधित व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
गोरेगाव नेस्कोच्या जागेत कोरोना काळजी केंद्र अर्थात कोरोना केअर सेंटर दोनची उभारणी केली. परंतु ही उभारणी करताना महापालिकेने रोमेल बिल्डर कंपनीला विनानिविदा दहा कोटींचे काम बहाल केले. यामध्ये या कंपनीला ज्या दरामध्ये भाडेतत्वावर उभे पंखे, खाट, सी.सी.टिव्ही तसेच अन्य वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यापेक्षा कमी दरात महापालिकेला यासर्व स्वत: विकत घेता आल्या असत्या आणि महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळता आले असते. त्यामुळे याबाबतचा घोटाळा भाजपचे आमदार अमित साटम यांनी निदर्शनास आणून महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. परंतु आयुक्तांकडे तक्रार करूनही त्यांनी या प्रकरणाची दखल न घेता त्यावर पडदा टाकण्याचे काम केल्याने अखेर साटम यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
(हेही वाचा – Central Govt : केंद्र सरकार राज्यांना राष्ट्रीय राखीव साठ्यातून तूरडाळ उपलब्ध करणार)
गोरेगावमधील नेस्कोतील कोरोना केअर सेंटरचे काम रोमेल बिल्डरला निविदा न मागवल्याशिवाय कंत्राट दिल्याने यासंदर्भातील घोटाळ्याप्रकरणी मी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. रोमेल बिल्डरने यापूर्वी कोणत्याही हॉस्पिटल, नर्सिग होम्सचे काम केलेले नाही. तसेच मेडिकलच्या वस्तू पुरवल्या नाहीत किंबहुना हॉस्पिटल सामृग्रीचे ते उत्पादकही नाहीत. तरीही निविदा मागवल्याशिवाय त्यांना महापालिकेने साडेदहा कोटी रुपयांचे कंत्राट थेट दिले. यामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झालेला संशय अमित साटम यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. यामध्ये कुणाला तरी फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेने केलेला आहे. त्यामुळे त्याविरोधात लोकायुक्तांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करून सखोल चौकशीची मागणी केली होती. तसेच यामध्ये जे दोषी आढळतील त्या व्यक्ती किंवा अधिकारी त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी,अशाप्रकारची मागणी साटम यांनी आपल्या तक्रारींमध्ये केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community