बोरीवली पश्चिम, शांती आश्रम बस डेपो, आय. सी कॉलनी, कल्पना चावला रोड रस्त्यावरील मॅनहोलचे लोखंडी झाकण चोरणाऱ्या झाकण चोराला आणि ही झाकणे विकत घेणाऱ्या भंगारवाल्याच्या मूसक्या अखेर बोरिवली पोलिसांनी आवळल्या. या भागातून तब्बल २६ मॅनहोल्सची झाकणे चोरीला गेली होती आणि ही सर्व झाकणे त्यानेच चोरली होती, हे तपासात उघड झाले. त्याने चोरलेली ही झाकणे कुठे विकली याची माहिती घेऊन भंगार सामान विक्रेत्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरी केलेल्या झाकणाची किंमत म्हणून ९५०० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेच्या आर मध्य विभागा तर्फे प्राजक्ता दवंगे यांनी २० जून २०२३ रोजी बोरिवली ठाण्यात मॅनहोल्सच्या लोखंडी झाकणाच्या चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी कल्पना चावला रोड, शांती आश्रम बस डेपो, आय. सी कॉलनी, बोरीवली पश्चिम, येथील डांबरी रोडवरील मध्यभागी असलेले मॅनहोलचे लोखंडी झाकण,ज्यावर एमसीजीएम (MCGM) असे लिहिलेले व त्यापुर्वी विविध ठिकाणावरून एकुण २६ नग जुने वापरते लोखंडी झाकणही कोणीतीरी अज्ञात इसमाने चोरी केले आहेत, असे नमूद केले.
(हेही वाचा – वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता)
या दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि. अखिलेश बोंबे व त्यांच्या टीमने घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले. त्यानुसार २२ जून २०२३ रोजी कमलेश उर्फ बंटी जगदिश सोलंकी (२९) याला ताब्यात घेण्यात आले. तपासामध्ये त्याने चोरी केलेले झाकण हे अब्दुल गली मोहम्मद नजीर शाह (५१) या भंगार विक्रेत्याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार भंगार विक्रेत्याला अटक करण्यात आली. या आरोपीकडून या गुन्हयातील चोरी केलेल्या झाकणाची ९५०० रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे.
अटक करण्यात आलेला झाकण चोर हा चालक असून तो बोरीवली पश्चिमेला गणपत पाटिल नगर,,गल्ली नं १ मध्ये राहणारा आहे तर भंगार विक्रेता दहिसर पश्चिम श्री आंबेश्वर चाल, त्रिवेदी कंपाउड, कांदरपाडा येथे व्यवसाय करणारा आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई राजीव जैन, मा. पोलीस आयुक्त, परिमंडळ- ११ चे अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोआ बोरीवली विभाग धरणेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम.एच.बी कॉलनी पोलीस ठाणेसुधीर कुडाळकर, पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांच्या प्रत्यक्ष देखरेखी खाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार, पोलीस उप निरीक्षक अखिलेश बौबे यांनी पार पाडली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community