पुढील ४-५ दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त, विभागीय उपायुक्त आणि पर्जन्य जल वाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देत, पाणी तुंबणारे सखल भाग आणि भुयारी मार्ग आदी ठिकाणी पाणी तुंबल्यास तातडीने यंत्रणांना कामाला लावून पाण्याचा निचरा योग्यरीतीने होईल याची काळजी घेण्याचे कळवले आहे.
(हेही वाचा – अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा जप्त करणार; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय)
महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या निर्देशामध्ये, आजपासून पुढील ४-५ दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सखल भागांना भेटी द्याव्यात आणि जेथे पूर येण्याची शक्यता आहे तेथे तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.
आवश्यक असल्यास, डिवॉटरिंग पंप विलंब न करता सक्रिय करणे आवश्यक आहे, असे निर्देश दिले आहेत. तसेच प्रभाग अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी परिसरातील सर्व भुयारी मार्गांवरही बारीक नजर ठेवावी. यापैकी काही ठिकाणांना मी स्वतः भेट देईन असेही इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community