सबंध देशभरातील वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी नीती आयोगाने मिथेनॉल अर्थव्यवस्थेचा रोडमॅप बनवला आहे. यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी देखील मदत होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी १५% मिथेनॉलमिश्रित डिझेल व मिथेनॉल ट्रकच्या वापरावर भर दिला आहे. ते म्हणाले, पेट्रोलियम मंत्रालय १५% मिथेनॉलमिश्रित डिझेल वापराच्या धोरणावर काम करत आहे. आम्हीही याची शिफारस केली आहे. मिथेनॉल ट्रकची संख्याही वाढत आहे.
(हेही वाचा – Stock Market : सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक; सेन्सेक्स ६३७१६ तर, निफ्टीची विक्रमी घौडदोड)
आसाममध्ये आसाम पेट्रोकेमिकल्स रेझा १०० टन मिथेनॉल बनवत आहे. राज्यातील ट्रकचे मिथेनॉल ट्रकमध्ये रूपांतर करता येईल का, असे त्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना विचारले. नीती आयोगाने मिथेनॉल अर्थव्यवस्थेचा रोडमॅप बनवला आहे. गडकरी म्हणाले, एक लाख कोटींच्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे भारतमालाचे सर्व प्रमुख प्रकल्प २०२५-२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ९ वर्षांत देशामध्ये रस्त्यांचे जाळे ५९% वाढले आहे. हे अमेरिकेनंतर जगातील दुसरे सर्वात मोठे नेटवर्क बनले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community