सरकारने ऊसाचा एफआरपी वाढविला; आता क्विंटलमागे ३१५ रुपये मिळणार

233
सरकारने ऊसाचा एफआरपी वाढविला; आता क्विंटलमागे ३१५ रुपये मिळणार
सरकारने ऊसाचा एफआरपी वाढविला; आता क्विंटलमागे ३१५ रुपये मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एफआरपी प्रति क्विंटल १० रुपयांनी वाढवून ३१५ रूपये करण्याचा निर्णय घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा पाच कोटी शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगावर अवलंबून पाच लाख मजुरांना होणार आहे. केंद्र सरकारचे प्रवक्ते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाचा एफआरपी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. उसाच्या सर्वाधिक आणि किफायतशीर दरात (एफआरपी) १० रूपयाची वाढ केली आहे. यामुळे उस उत्पादक शेतकÚयांना प्रति क्विंटलमध्ये ३१५ रूपये मिळतील.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा देशातील पाच कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यासोबतच साखर कारखान्यात काम करणाऱ्या पाच लाख कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. मोदी यांनी नेहमीच बळीराजाची बाजू उचलून धरली असल्यााचे मतही ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्र सरकारनुसार, वर्ष २०२३-२४ साठी उसाचा उत्पादन खर्च १५७ रुपये प्रती क्विंटल आहे. त्यामुळे १०.२५ च्या वसुली दरासह उसाला देण्यात आलेला ३१५ रुपये प्रती क्विंटल हा एफआरपी उत्पादन खर्चापेक्षा १००.६ टक्क्यानी जास्त आहे. विद्यमान साखर हंगाम २०२२-२३ मध्ये देण्यात आलेल्या एफआरपी पेक्षा २०२३-२४ साठी जाहीर झालेला एफआरपी ३.२८ नी जास्त आहे.

(हेही वाचा – Magathane : मागाठाणे मेट्रो स्थानकालगतची जमीन खचली)

साखर कारखान्यांनी वर्ष २०२३-२४ च्या साखर हंगामात (१ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या) ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या ऊसाला हा एफआरपी लागू होणार आहे. कृषीविषयक खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी)सदस्यांनी केलेल्या शिफारसी तसेच राज्य सरकार आणि इतर संबंधित भागधारकांशी केलेली चर्चा यांच्या आधारावर सरकारने एफआरपीचा निर्णय घेतला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.