मुंबई आणि ठाण्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबई, ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे काही भागात वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. तर मुंबईकरांना पाण्यातूनच वाट काढून चालावे लागत आहे. अशातच मुंबईत मालाड, गोरेगाव आणि भायखळा येथे झाड कोसळून लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, रेल्वेसेवा देखील धीम्या गतीने सुरु आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागात उद्यापर्यंत म्हणजे ३० जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
#WATCH | Maharashtra: Andheri Subway waterlogged in Mumbai as rain continues to lash the city pic.twitter.com/YRfX3RbO2v
— ANI (@ANI) June 28, 2023
(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा; १२ लाखांहून अधिक वैष्णवांची मांदियाळी)
झाड कोसळून मृत्यू
मुंबईच्या भायखळ्यात एका घरावर झाड कोसळलं. यावेळी घरात झोपलेल्या ५-६ जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुंबईत पावसाळा सुरू झाल्यापासून झाड पडल्यामुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. काल म्हणजेच बुधवार २८ जून रोजी पश्चिम उपनगरांत झाड पडून दोघांचा मृत्यू झाला आणि रात्री भायखळ्यात झाड पडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रेहमान खान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात आज (गुरुवार २९ जून) मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच मध्य प्रदेश आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, झारखंडमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community