रहिवासी संकुलात कुर्बानीला बंदी; उच्च न्यायालयाचा निर्णय

या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारा, असे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने राज्य सरकारसह, पालिका प्रशासनाला दिले.

218
रहिवासी संकुलात कुर्बानीला बंदी; उच्च न्यायालयाचा निर्णय

रहिवासी संकुलांमध्ये विनापरवानगी बकऱ्यांची कुर्बानी देता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय न्यायालयाने बुधवारी (२८ जून) दिला. बकऱ्यांच्या कुर्बानीवर बंदी घालतानाच या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारा, असे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने राज्य सरकारसह, पालिका प्रशासनाला दिले.

(हेही वाचा – भाजप-राष्ट्रवादी युती ठरली होती, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट)

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील रहिवासी संकुलात खुल्या जागेत देण्यात येणाऱ्या बकऱ्यांच्या कुर्बानी विरोधात हरेश जैन आणि अपेक्षा शाह या गिरगावातील दोन रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. ईदच्या पार्श्वभूमीवर या याचिकेवर बुधवारी उशीरा न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी याचिकाकर्त्यांनी खुल्या जागेत जनावरांची कुर्बानी दिल्यामुळे अनेक प्रकारचे प्रदूषण तसेच रोगराई पसरण्याचा धोका असल्याचा दावा केला. बकऱ्यांच्या कुर्बानीबाबत वेळो- वेळी तक्रारी देऊनही स्थानिक पोलीस दाद देत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच रहिवाशी संकुलात बकऱ्यांच्या कुर्बानीला मनाई करण्याची विनंती केली. खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत रहिवाशी संकुलात बकऱ्यांच्या कुर्बानीला मनाई करण्याची विनंती मान्य केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.