राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या जोरदार हालचाली पक्षात सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आता मला नको, पक्षातीलच पद पाहिजे अशी अजित पवार यांनी ताठर भूमिका घेतल्यापासून पक्षाची झालेली कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी (२८ जून) दिल्लीत बैठक झाली. नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत दिल्लीतील ही पहिलीच बैठक होती. त्यामुळे अजित पवार यांनी जाहीर केलेल्या इच्छेचा विचार करून या बैठकीतच नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीवर चर्चा होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, या बैठकीत त्यावर चर्चा झाली नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
(हेही वाचा – समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचा मोदी सरकारला पाठिंबा; पण …)
अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला शरद पवार यांचे कट्टर ज्येष्ठ समर्थक वगळता कोणाचाही विरोध नाही. बहुतांश आमदारांचा छुपा पाठिंबा पाहून दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही अजित पवार यांच्या बाजूने झुकते माप दिल्याची दखल सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community