कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक

244
कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे फडणवीसांनी केले कौतुक

मंगळवार (२७ जून) एकतर्फी प्रेमातून पुन्हा एकदा तरुणीवर एका तरुणाने भर दिवसा रस्त्यात कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे पुण्यातील सदाशिव पेठेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात तरुणीला कोयत्याने झालेल्या हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचंही व्यक्तिगतरित्या कौतुक केलं. भाजपाचे माजी आमदार व पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून हा संवाद झाला. यावेळी फडणवीसांशी बोलताना लेशपाल जवळगेनेही उपमुख्यमंत्री यांनी स्वतः फोन करून याची दाखल घेतली याचे कौतुक केले.

नेमका प्रकार काय?

पुण्यातील मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ या ठिकाणी एकतर्फी प्रेमाच्या वादातून एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर भरदिवसा कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र वेळीच दोन तरुणांनी म्हणजेच लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांनी हल्लेखोर तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मुलीचा जीव वाचला आहे. याप्रकरणी पेरुगेट पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

‘त्या’ तीन हवालदारांचे निलंबन

पुण्यातील सदाशिव पेठेत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र त्यावेळी या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट पोलीस चौकीमध्ये पोलीस हवालदार उपस्थित नव्हते. त्यामुळे कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस हवालदारांचे निलंबन करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.