Chandrasekhar Bawankule : शरद पवार डबल गेमर; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

271
Chandrasekhar Bawankule : शरद पवार डबल गेमर; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
Chandrasekhar Bawankule : शरद पवार डबल गेमर; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मुंबई – शरद पवार नेहमी डबल गेम खेळतात, याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक घडामोडींचे दाखले देता येतील. त्यांची कृती आणि उक्ती वेगळी असून, यात त्यांचा हातखंडा आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, शरद पवारांनी त्यांच्या जीवनात अनेक सरकारे बसवली आणि पाडलीही. ते बोलतात एक आणि करतात दुसरेच, हे सर्वांनी पाहिले आहे. मंत्र्यांच्या सुमार कामगिरी विषयी विचारले असता बावनकुळे म्हणाले, ज्या मंत्र्यांची कामगिरी सुमार आहे, अशांना देवेंद्र फडणवीसांनी काही सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे आणि अधिक चांगल्या पद्धतीने कामे व्हावे, ही भावना त्यामागे आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारच…! स्वमुखाने दिली कबुली)

सरकारची कामे जनतेसाठी व्हावी, ही इच्छा असते आणि त्याच इच्छेने फडणवीसांनी मंत्र्यांना सूचना केली. आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमचे सरकार असताना समाजातील सर्व घटकांसोबत न्याय व्हावा, अशी त्यामागची भावना आहे, असेही बावनकुळे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत. छोट्या-मोठ्या जाहिरातीवरून त्यांच्यातील संबंध खराब होतील, असे नाही. दोन्ही नेते विचारांनी प्रगल्भ नेते आहेत, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानचे गुणगाण करणाऱ्या शक्तींना उद्ध्वस्त केलेच पाहिजे

सोलापूरमध्ये ‘लव्ह पाकिस्तान’ असे लिहिलेले फुगे झळकले, यावर प्रतिक्रिया विचारली असता बावनकुळे म्हणाले, असे कृत्य करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळालं नाही, तर त्यांची हिंमत होणार नाही. भारतात राहून पाकिस्तानचे गुणगाण करणाऱ्या शक्तींना उद्ध्वस्त केलेच पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकार अशा शक्तींना शोधून काढेल आणि जमिनीत गाढल्याशिवाय राहणार नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.