आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह आयसीआयसीआय, अॅक्सिस, एचडीएफसी, आयडीबीआय आदी खासगी बँकाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करू शकतील. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत केवळ पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक केली जात होती. यात ७.५ टक्के व्याज मिळेल.
(हेही वाचा – Chandrasekhar Bawankule : शरद पवार डबल गेमर; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका)
या योजनेची घोषणा २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात केली होती आणि या वर्षी १ एप्रिलपासून ती सुरू करण्यात आली. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, या छोट्या बचत योजनेत एप्रिल-मे २०२३ दरम्यान १०.३० लाख खात्यांमध्ये जवळपास ६ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत बँक ठेवीमध्येही ४ पट वाढ झाली आहे. ती एप्रिल-मे २०२२ मधील ६ हजार कोटींवरून एप्रिल-मे २०२३ मध्ये २३ हजार कोटी रुपये झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community