नागपूर येथे प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेयसीला इस्टाग्रामवर मेसेज केल्याच्या वादातून श्रेयांश पाटील या तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आली. बाराखोलीजवळच्या रिपब्लिकन नगरमध्ये लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने अमित मिश्रा या तरुणाने श्रेयांश पाटीलची हत्या केली. हा सर्व प्रकार गुरुवार २९ जून रोजी घडला.
नेमका प्रकार काय?
अमित मिश्रा आणि श्रेयांशची प्रेयसी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. अशातच अमित त्याच्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवरून मेसेज करायचा आणि त्याचे मेसेज ती पुन्हा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करायची. मात्र हा सर्व प्रकार श्रेयांश याला आवडत नव्हता. त्यामुळे त्याने अमित मिश्रा याला ‘माझ्या प्रेयसीला मेसेज करू नको’ असे धमकावले. यावरुन त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता.
(हेही वाचा – ठाकरे गटाला पुन्हा झटका; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तिय जाणार शिंदे गटात)
वरील सर्व प्रकार घडल्यानंतर आरोपी अमित आणि त्याचा साथीदार गुरुवारी श्रेयांशच्या घरी आले. आरोपी अमितने श्रेयांशला चर्चा करण्यासाठी बौद्ध विहाराजवळ येथे येण्यास सांगितले. श्रेयांशनेही आपल्यासोबत घातपाताच होण्याचा धोका ओळखून सावधगिरी म्हणून तो आपल्या सोबत चाकू घेऊन गेला होता. बौद्ध विहाराजवळ आरोपी आणि श्रेयांशमध्ये हाणामारी झाली. अमितने आधी रॉडने श्रेयांशवर हल्ला केला आणि मग त्याच्याच चाकूने त्याच्यावर वार केले. त्यानंतर हल्ला करुन अमित फरार झाला. या हल्यात श्रेयांश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या संपुर्ण प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात होता. परंतु, इन्स्टग्रामवर केलेल्या मेसेजवरुन वाद झाल्याने हे हत्याकांड घडले, अशी माहिती पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community