फॉरेनरने हनुमान चालीसा गाऊन जिंकलं भारतीयांचं मन

279
फॉरेनरने हनुमान चालीसा गाऊन जिंकलं भारतीयांचं मन

हल्ली जगभरात हिंदू धर्माविषयी लोकांची आत्मीयता वाढताना दिसतेय. आपली भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी जगभरातील लोक इथे येऊन रिसर्च करत आहेत. एवढेच नाही तर आपले वेदशास्त्र, स्तोत्र-मंत्र इत्यादींचा अर्थ समजून घेऊन त्यांचा अभ्यास करत आहेत. दरदिवशी सोशल मीडियावर याचे पुरावेही आपल्याला पाहायला मिळतील. असाच एक व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक परदेशी महिला हातात गिटार घेऊन हनुमान चालीसा गात आहे. तिच्या सोबत आणखी एका माणसाने श्रीराम नामाचा जप करत बीटबॉक्सिंगवर ताल पकडला आहे आणि कॅमेरा फिरल्यावर आपल्याला दिसते की, एक वयस्कर दिसणारा माणूस व्हायोलिन वाजवत आहे.

हनुमान चालीसा गातांना त्यांच्या चेहऱ्यावर पराकोटीचा आनंद आणि समाधान दिसत आहे. परदेशी माणसांच्या तोंडून हनुमान चालीसा ऐकणे हे हिंदू धर्मियांसाठी अभिमान वाटण्यासारखे आहे. कारण यामुळे स्पष्ट होते की आपला सनातन हिंदू धर्म, आपली संस्कृती यांचे महत्त्व जगभरातील लोकांना पटत आहे.

(हेही वाचा – भारताला २०४७ पर्यंत विकसीत राष्ट्र बनवणार – पंतप्रधान मोदी)

हा सुंदर व्हिडिओ नक्की पाहा

https://www.instagram.com/p/Cta318mJ0z4/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA%3D%3D

@music_ki_duniya_1213 या युजरने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या या महिलेने सर्व भारतीयांची मनं जिंकली आहेत असं म्हणायला हरकत नाही. परदेशातील लोक आपल्या संस्कृती आणि स्तोत्र-मंत्रांविषयी आदरभाव ठेवतात ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशी चर्चा लोक सोशल मीडियावर करत आहेत.

हिंदू धर्म हा सनातन धर्म मानला जातो. आपल्या धर्माची सुंदरता आणि उदारतेने परदेशातील लोकांना नेहमीच भुरळ घातली आहे. परदेशातले लोक दरवर्षी मोठ्या संख्येने आपल्या भारतभरातील धार्मिक स्थळांना भेट देत असतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.