मेटा कंपनीच्या इन्स्टन्ट मॅसेजिंग अॅप WhatsAppचे आणखी एक WhatsApp Business म्हणून एक अॅप आहे. WhatsApp बिझनेस या अॅपच्या जगभरातील युजर्सचा आकडा दोनशे मिलियनपर्यंत पोहोचला आहे. हा आकडा 2020 सालपर्यंत पन्नास मिलियनपर्यंत होता तो आता चार पटीने वाढला आहे.
WhatsApp Business हा अॅप 2018 साली लॉन्च केला गेला होता. छोट्या स्तरावरच्या व्यावसायिकांना आपल्या ग्राहकांपर्यंत थेट पोहोचता यावं तसेच ग्राहकांनाही थेट आणि सोप्या पद्धतीने व्यवहार करता यावा म्हणून हा अॅप सुरू करण्यात आला होता. त्यानंतर यावर्षी म्हणजेच 2023 साली व्हाट्सअॅपने आपल्या बिझनेस अॅपमध्ये एक नवीन टूल ऍड केल्याची घोषणा केली आहे.
(हेही वाचा – Vileparle : विलेपार्लेतील कॅप्टन गोरे उड्डाणपूल सेफ)
व्हॉट्सअॅप कंपनीने आपल्या ब्लॉगच्या एका पोस्टमध्ये सांगितलं की, व्हाट्सअॅप बिझनेसद्वारे आपले संपूर्ण काम चालवणाऱ्या लोकांना आता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी फेसबुक अकाऊंटची गरज नाही. तुम्ही जर तुमचा बिझनेस संपूर्णपणे व्हाट्सअॅपद्वारे चालवत असाल तर तुम्ही डायरेक्ट व्हाट्सअॅपवर पोस्ट तयार करून कुठेही शेअर करू शकता.
व्हाट्सअॅप बिझनेस सुरू करण्यासाठी छोट्या व्यावसायिकांना फक्त एक ईमेल आयडी आणि एक डे रकमेचा फॉर्म भरण्याची गरज आहे. या अॅपमध्ये लोकांनी तुमच्या जाहिरातीवर क्लिक केले तर त्यांच्याकडे सरळ एक व्हाट्सअॅप चॅट ओपन होते. या चॅटमधून ग्राहक तुमच्या प्रोडक्टविषयी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि ते प्रोडक्ट विकतही घेऊ शकतात. याव्यतिरिक्त कंपनीने हेही सांगितलं की, लवकरच व्हाट्सअॅप बिझनेस अॅपमध्ये एका नव्या फिचरचे परीक्षण सुरू आहे. ज्यामध्ये व्यावसायिक आपल्या ग्राहकांना पर्सनालाईज्ड संदेशही पाठवू शकतात. जसे की, रिमाईंडर्स, वाढदिवसाच्या शुभेच्छा इत्यादी गोष्टी यात असतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community