मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाळ्यात अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडले असून बोरीवली गोराई परिसरात तुंबणाऱ्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहे. शिंपोली रोड आणि गोराई एक आणि दोन भागांमध्ये अनेक भागांमध्ये खड्डयांची समस्या पुन्हा एकदा आवासून उभी राहिली आहे.
मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डयांची समस्या निकालात काढण्यासाठी यंदा पाच ते सहा एजन्सी नियुक्त करत त्याद्वारे सुमारे ६४० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे याद्वारे पावसाळ्यापूर्व अनेक भागांमधील खड्डे दुरुस्तीचे काम पूर्ण केले असले तरी अनेक भागांमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रकार घडले आहे.
शिंपोली रोड मेट्रो सिग्नल लिंक रोड, शिंपोली टेलिफोन एक्सचेंज बस स्टॉप, गोराई शिंपोली रोड, पंपिग स्टेशन, शुभम पार्टी हॉल, गोराई दोन मधील सप्तदीप गल्ली, हनुमान गल्ली आदी भागांमधील रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी या खड्डयांच्या समस्याबाबत महापालिकेकडे तक्रार करत सर्व रस्त्यांवरील खड्डयांची छायाचित्रे सोबत पाठवून हे खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बोरीवली गोराई आणि शिंपोली परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यानंतर स्वत: शिवानंद शेट्टी यांनी रस्त्यांवर उतरत लोकांना मार्गदर्शन करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्याचा निचरा करण्यासाठी तैनात करून घेतले. महापालिकेच्या कामगारांना पाचारण करत तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्नही केला होता. त्यानंतर आता याच पाणी तुंबलेल्या तसेच अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने विभागातील विविध रस्त्यांची माहिती घेत त्यांच्या तक्रारी महापालिकेकडे करत याचे निवारण त्वरीत करण्याची मागणी केली आहे.
गोराई बोरिवली या भागातील रस्त्यांवर आहेत खड्डे
- शिंपोली रोड मेट्रो सिग्नल लिंक रोड
- शिंपोली टेलीफोन एक्सचेंज बस स्टॉप
- प्लॉट ८५, गोराई शिंपोली रोड गोराई १
- प्लॉट ८४, पंपिंग स्टेशन गोराई १
- शुभम पार्टी हॉल गोराई १
- प्लॉट २०१ RSC ३१ गोराई २
- प्लॉट २०२ RSC ३१ गोराई २
- RSC २३, गोराई २
- RSC १७/२७ गोराई २
- RSC २४ गोराई २
- प्लॉट १२६ RSC २६ गोराई २
- RSC २२, सप्तदिप गल्ली गोराई २
- RSC २२, हनुमान गल्ली गोराई २
- प्लॉट २४३, RSC ४४ गोराई २
- प्लॉट ७९ मागे RSC ४३ गोराई २
हेही पहा –
Join Our WhatsApp Community