Sangli : शाळा व महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले जमा करून घेण्यास मुदतवाढ

276
Sangli : शाळा व महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले जमा करून घेण्यास मुदतवाढ
Sangli : शाळा व महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले जमा करून घेण्यास मुदतवाढ

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे शासन स्तरावरून सांगलीतील सर्व शाळा व महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले जमा करून घेण्यासाठी १० जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत दिली.

महसूल प्रशासनामार्फत दाखले वितरीत करण्याबाबत कामकाज केले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील उपविभागीय, तहसिल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीचे व अन्य दाखले मागणीसाठी अर्ज प्राप्त होत आहेत. दाखले हे ऑनलाईन पद्धतीने तयार करून वितरीत करण्याची प्रणाली कार्यरत आहे. काही उपविभागीय, तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी ऑनलाईन कामकाजामध्ये सर्व्हरची गती अतिशय कमी असल्याने दाखले तपासणे व ते मंजूर करून वितरीत करण्यास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेवून शासन स्तरावर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यामार्फत पाठपुरावा करण्यात आला असता शासन स्तरावरून सर्व शाळा व महाविद्यालये यांना प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले जमा करून घेण्यासाठी १० जुलै पर्यंत मुदतवाढ दिली असल्याबाबत सांगण्यात आले असून याबाबतच्या लेखी सूचना लवकरच निर्गमित करण्यात येत असल्याबाबत कळविले आहे.

(हेही वाचा – Sanjeev Jaiswal : आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी)

त्याचबरोबर मुदतीत दाखले वितरीत करणे आवश्यक असून महा ऑनलाईन पोर्टल बाबतच्या अडचणीचे निराकरण होईपर्यंत महा ऑनलाईन पोर्टल द्वारे वितरीत केले जाणारे सर्व दाखले ऑफलाईन पद्धतीने वितरीत करण्यास परवानगी मिळण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला असून जिल्हा प्रशासनामार्फत पाठपुरावा सुरू आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.