घरात टोमॅटो नाहीत? काळजी नसावी, टोमॅटो ऐवजी वापर आता ‘हे’ पदार्थ

256
घरात टोमॅटो नाहीत? काळजी नसावी, टोमॅटो ऐवजी वापर आता 'हे' पदार्थ

टोमॅटो ही एक अशी फळभाजी आहे जीचा वापर शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पदार्थांमध्ये केला जातो. मात्र सध्या बाजारात टोमॅटोच्या दराने शंभरी पार केल्याने अनेकांच्या जेवणातून टोमॅटो गायब होण्याची शक्यता आहे. मात्र आता चिंता सोडा आणि टोमॅटोला पर्याय म्हणून स्वयंपाकघरात या पदार्थांचा वापर करा.

(हेही वाचा – हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतोय, या अंगावर; आदित्य ठाकरेंचे शिंदे आणि भाजपाला आव्हान)

पदार्थात आंबट चव येण्यासाठी तुम्ही आता टोमॅटो ऐवजी दही, चिंच, व्हिनेगर, आवळा, लिंबाचा रस, किंवा कोकम यांसारख्या पदार्थांचा वापर करु शकता.

टोमॅटोमध्ये लाइकोपिनचे प्रमाण जास्त आहे, जे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे व्यवस्थापन करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे,

दही – दही हे प्रोबायोटिक आहे. दह्यात ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिकचे प्रमाण कमी असते. तसेच एचडीएल किंवा चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दही फायदेशीर असते, याशिवाय दही वजन कमी करण्यासही मदत करते.

चिंच – चिंचेत असलेले फ्लेव्होनॉइड्स एलडीएल कमी करतात आणि एचडीएलचे प्रमाण वाढवतात. चिंचेमधील पोटॅशियमचे प्रमाण तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तर,

कोकम – कोकम हे लो कॅलरीसाठी ओळखले जाते. फायबरने समृद्ध असलेल्या कोकमात टोमॅटोमध्ये असलेली व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि जस्त ही जीवनसत्वे आढळतात.

त्यामुळे आता सर्वांनाच टोमॅटोचे वाढते दर लक्षात घेता त्याला पर्याय म्हणून वरील पौष्टिक पदार्थांचा स्वयंपाकात वापर करता येऊ शकतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.