ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य असंतोषाने गेले २ महिने धुमसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून मणिपूरमधील हिंसाचार थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, “अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळे दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली, तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा.”
अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळे दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांना विनंती आहे… pic.twitter.com/lRjS4eMAA8
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2023
मणिपूर हिंसाचाराचे नेमके प्रकरण काय?
- मैतई समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिलला निर्देश दिले होते. मात्र, या निर्णयाला नागा अणि कुकी समुदायाने विरोध दर्शवला. या निर्णयाविषययी आक्षेप नोंदवण्यासाठी मणिपूरमधील ऑल ट्रायबल स्टूडंट यूनियनने एका मोर्चाचे आयोजन केले.
- परंतु, मोर्चेकरी आणि विष्णू नगर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वाद झाला. या वादाने हिंसेचे रूप धारण केले ज्यात येथील मैतई अणि नागा कुकी समुदायातील लोकांनी एकमेकांची घरे जाळली.
- त्यानंतर हे हिंसेचे पडसाद राज्यभर उमटल्याने वातावरण अधिक तापले. परिणामी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले.