झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या क्रिकेट पात्रता स्पर्धेत स्कॉटलँडने दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत मोठा उलटफेर केला आहे. या पराभवामुळे वेस्ट इंडिजला भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. पात्रता फेरीतच वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आले आहे.
सुपर सहा फेरीच्या सामन्यात स्कॉटलँड संघाने वेस्ट इंडिज संघाला ७ गडी राखून पराभूत केले. त्यामुळे वेस्ट इंडीज संघ २०२३ वनडे विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या शर्यतीतूनही बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ असे दोनवेळा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले आहे. एकेकाळी क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारा वेस्ट इंडिज संघ यंदा विश्वचषकात खेळताना दिसणार नाही.
(हेही वाचा – आदित्य ठाकरे भडकले : महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या फाईल्स तयार केल्या, सत्ता आल्यानंतर सर्व लुटारुंना आत टाकणारच)
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने १८१ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कॉटलँडने सात गडी आणि ३९ चेंडू राखून १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. परिणामी, टी २० आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ खेळताना दिसणार नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community