मुंबई महापालिकेत शिपाई म्हणून सेवेत लागल्यापासून ते सेवा निवृत्त होईपर्यंत सातत्याने अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांच्या कार्यालयातच कार्यरत राहण्याचा प्रकार हा दुर्मिळ मानला जातो. परंतु असे घडले आहे. महापालिकेचे मुख्य जमादार असलेले उमेश जाधव यांनी ही किमया साधली आहे. सेवेत लागल्यापासून ते निवृत्तीपर्यंत त्यांनी मुख्यालयातच सेवा बजावली. मात्र, ३३ वर्षांच्या सेवेत तीन ते चार वर्षांची उपायुक्तांच्या कार्यालयात केलेली सेवा वगळता उर्वरीत सर्व सेवा त्यांनी शिपाई म्हणून अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांच्या कार्यालयातच केली आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्यालयातील मुख्य जमादार असलेले उमेश लक्ष्मण जाधव हे १ जुलै २०२३ रोजी सेवा निवृत्त झाले. मागील दोन वर्षांपासून ते महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात मुख्य जमादार म्हणून कार्यरत होते. परंतु यापूर्वी त्यांनी सनदी अधिकारी सुधा भावे या अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर दासगुप्ता, पृथ्वीराजा बायस, रत्नाकर गायकवाड, शर्वरी गोखले, गौतम चटर्जी, मनिषा म्हैसकर, संजय देशमुख आदी अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम पाहिले.
(हेही वाचा – Raj Thackeray : मणिपूर हिंसाचाराबाबत राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाले…)
शुक्रवारी आयुक्तांच्या कार्यालयाचे सहआयुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करत त्यांनी केलेल्या सेवेबद्दल गौरव करण्यात आला आणि त्यांच्या जीवनातील पुढील वाटचालीस उपस्थित कर्मचाऱ्यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community