Buldhana Bus Accident : मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार; नातलगांवर वेदनादायी प्रसंग

218

बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला, मृतदेह इतके जळाले की त्यांची ओळख पटवणे अशक्य झाले. कोण कुणाचे आप्तेष्ट समजणे कठीण बनले. अशा वेळी अंत्यसंस्कार करावेच लागणार, म्हणून अखेर प्रशासनाने सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवार, २ जुलै रोजी स्मशानभूमीत मृतांच्या नातलगांच्या हंबरडा फुटला.

एकेकास शवागारात ओळख पटविण्यासाठी नेण्यात आले. पण कसचे काय, एकही आपला जिवलग ओळखण्यास असमर्थ ठरला. घरून निघाला होता, त्यावेळी झाले तेच अंत्यदर्शन ठरले. रडायचे कोणाला पाहून, असाच बाका आणि संवेदना नष्ट करणारा अनुभव नातलगांच्या होता. सर्वांचा एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मान्य करावा लागला. दुःखाचे हुंकार क्षणभर बाजूला पडले. बुलढाणा प्रशासनाने सर्वांची सोय हॉटेलात केली आहे. तिथे जिवलगाच्या आठवणीतच काळरात्र कशीबशी निघाली. जवळपास शंभर आप्त पोहोचले. प्रशासनाने त्यांना धीर देत स्मशानभूमीत आणले.

(हेही वाचा ED : ‘ईडी’ची मोठी कारवाई; ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतून एकाला घेतले ताब्यात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.