महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी, २ जुलै रोजी पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली. गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह राजभवनात दाखल झाले असून, मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सर्व घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी ट्विट करत आजच्या घडामोडीवर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे, लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभं करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही. आणखी एका ट्विटमध्ये राऊत म्हणतात, भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.
(हेही वाचा Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांचा समावेश)
Join Our WhatsApp Community