Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितले अजित पवारांच्या बंडामागील कारण; म्हणाले…

181

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या सर्व घडामोडीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच, हे इतरांसाठी नवीन असेल माझ्यासाठी नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान म्हणाले होते, राष्ट्रवादी भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष आहे. यावेळी त्यांनी इरिगेशन घोटाळ्याचा आणि शिखर बँकेचा उल्लेख केला. आणि आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. या आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले, त्यातून त्यांना मुक्त केले. मी मोदींचे आभार मानतो.

प्रश्न आता दुसरा… आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे, त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. उद्याच्या सहा तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही प्रश्न उपस्थित गेले होते. संघटनात्मक बदलाच्या दृष्टीने विचार करत होतो. पण प्रश्न उपस्थित केले गेले होते, त्यापूर्वीच पक्षापासून काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. आणि आम्हीच पक्ष आहोत, अशी भूमिका घेतली.

(हेही वाचा Ajit Pawar : राष्ट्रवादीचा सर्वाधिक 10 वेळा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा विक्रम )

माझं स्पष्ट मत आहे, आमदारांनी आणि नेत्यांनी घेतलेली भूमिकेसंदर्भात आणखी २ ते ३ दिवसांनी क्लिअर चित्र होईल. त्याचं कारण की ज्यांची नावं आली, त्यातल्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क करुन आम्हाला निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या, असं सांगितलंय. पण आमची भूमिका वेगळी आहे. ती कायम आहे, याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केलेला आहे. याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही. पण त्यांनी माझ्याइतकंच जनतेच्या समोर त्यांची भूमिका मांडावी. त्यांनी मांडली नाही तर वेगळी भूमिका घेतली, असं समजेन. मांडली तर माझा त्यांच्यावर विश्वास बसेन.

(हेही वाचा Congress : विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसचे गुढग्याला बाशिंग; ‘या’ नेत्यांमध्ये चढाओढ)

आता प्रश्न राहिला पक्षाच्या भवितव्याबाबतचा, असा प्रकार इतरांना नवीन असेल, मला तो नवीन नाही. १९८६ साली निवडणुकीच्या नंतर मी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होतो. तेव्हा ५८ पैकी ६ सोडले तर सगळे पक्ष सोडून गेले होते. मी त्या ५८ चा विरोधी पक्षनेता होतो. पक्षाची मोट बांधण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो. पक्षाची बांधणी करण्याचं ठरवलं. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा हीच संख्या ६९ वर गेली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.