मुंबई,पडघा, पुण्यासह पाच ठिकाणी एनआयएची छापेमारी; पाच संशयितांना अटक

'इसिस' या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते पाच ही जण

255
मुंबई,पडघा, पुण्यासह पाच ठिकाणी एनआयएची छापेमारी; पाच संशयितांना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई, ठाणे आणि पुण्यात छापे टाकून पाच संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाचही जणांचा ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय एनआयए कडून व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात एनआयए ने २८ जून रोजी गुन्हा दाखल करून नागपाडा येथील संशयिताच्या हालचलीवर लक्ष ठेवले.

मुंबईतील नागपाडा येथून सोमवारी (३ जुलै) पहाटे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे ‘ताबीज’ असे नाव असून ताबीज हा इसिस या संघटनेतील अमीर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. तसेच ताबीज याने ‘व्हाईस ऑफ हिंद’ या इसिस च्या मासिकेत लेख सुद्धा लिहल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ताबीज हा राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपाडा येथील मुख्य कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर राहण्यास होता. तेथूनच तो दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात राहून अतिरेकी कारवाया करीत असल्याचे समोर आले असले तरी याची पुसटशी कल्पना देखील मुंबई पोलीस आणि एटीएसला नव्हती.

(हेही वाचा – अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार – संजय राऊत यांची भविष्यवाणी)

दरम्यान एनआयएने ठाण्यातील पडघा येथील दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करत चार जणांना अटक केली आहे. हे चारही संशयित आणि ताबीज असे पाच जण इसिस या संघटनेच्या संपर्कात होते. पडघा आणि पुण्यातून अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अद्याप कळू शकलेली नाही. एनआयएच्या पथकाने पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आली आहे तसेच अटक करण्यात आलेल्या पाच ही जणांची एनआयए कडून कसून चौकशी सुरू आहे.

पडघागाव पुन्हा एकदा चर्चेत…..

एनआयएच्या छापेमारी मुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळ असणारे पडघा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एनआयए ने सोमवारी (३ जुलै) पडघ्यात दोन ठिकाणी छापेमारी करून दोन संशयितांना एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. २००२ आणि २००३ साली मुंबईतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक , विलेपार्ले आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पडघ्यातुन साकिब नाचनला अटक केली होती. नाचन याच्या अटकेमुळे पडघा गाव हे पहिल्यांदाच चर्चेत आले होते. पडघा येथे असलेल्या डोंगराळ भागात दहशदवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे समोर आले होते. साकीब नाचन याला अटक केल्यानंतर दहशतवाद प्रतिबंधक कायदा (पोटा) अंतर्गत शस्त्रे बाळगल्याबद्दल नाचनला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर नाचन आपल्या नातेवाईकांसह पडघा या मूळ ठिकाणी पुन्हा राहण्यास आला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.