उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी त्यात नवल नाही – राज ठाकरे

287
उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी त्यात नवल नाही - राज ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ हा दिवस फार मोठ्या घडामोडींमुळे महत्वाचा ठरला. काल म्हणजेच रविवार २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तसेच त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी रविवार (२ जून) युती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांना नक्की किती आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे हे अजून समोर आले नाही.

याच सर्व पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी त्यात नवल नाही’ अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद निश्चित; ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडील खाते मिळणार)

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्रात गेल्या दोन-अडीच वर्षापासून जे राजकारण सुरु आहे, ते दिवसेंदिवस किळसवाणं होत चाललंल आहे. या कोणलाही मतदारांशी काहीही देणं-घेणं नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल ती तडजोड करायची ही महाराष्ट्रामध्ये पेव फुटलं आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पवार साहेब कितीही, काहीही म्हणत असले की, त्यांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. तरी, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे नेते असेच पाठवल्याशिवाय जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरीही मला आश्चर्य वाटणार नाही. आपण हा सगळा ड्रामा पाहत आहोत. याची सुरुवात पहाटेच्या शपथ विधीने झाली, मग शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी झालं, आता शत्रू कोण आणि मित्र कोण याचं काही महाराष्ट्रात राहिलंच नाही. मला असं वाटतं लोकांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मी पुढच्या काही दिवसात मेळावा आणि बैठक घेणार आहे. लवकरच पुढच्या काही दिवसांमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरु होईल.

अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.