मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ येथील जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदामध्ये अज्ञात इसमाने विष टाकल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान पाणी प्यायलेले सात जण आरोग्य खात्याच्या निगराणीखाली आहेत. डिकसळ मंगळवेढा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाचे पाणी शाळेचे विद्यार्थी व लगतचे ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असून काल (रविवार २ जुलै) रात्री अज्ञात इसमाने विषारी औषध त्या हौदात टाकले.
सोमवार ३ जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे या भागातील नागरिकांनी घरात ते पाणी नेले. दरम्यान या पाण्याला कसला तरी वास येत असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर याची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शाळेच्या परिसराचा शोध घेतला असता त्या विषारी औषधाची बाटली सापडली असून सदरचे औषध मरवडे येथील दुकानातून घेतले आहे का? याचा तपास ग्रामस्थ करीत असून दरम्यान घटनास्थळी तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, गट प्रभारी गट शिक्षणाधिकारी पोपट लवटे यांच्या सह ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली.
(हेही वाचा – अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत)
सदर पाणी कोणीही पिऊ नये असे आवाहन करण्यात आले. ज्यांनी पाणी प्यायलेले आहेत असे ३ बालके व ४ पुरुष सध्या आरोग्य खात्याच्या निगराणी खाली जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत. सुदैवाने नागरिकाच्या जागरूकतेमुळे हा प्रकार लक्षात आला अन्यथा जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले असते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community