शरद पवार हेच आमचे नेते आहेत आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे, हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यासह सर्वच नेते मान्य करतात तर मग अध्यक्ष या नात्याने तटकरे आणि पटेल यांना रविवारीच पदमुक्त केले आहे. त्यामुळे पदे वाटायचा अधिकार किटी पार्टीला नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. राष्ट्रीय अध्यक्ष हे पद पक्षाच्या घटनेत मान्य केले आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पक्षाध्यक्षांना दिलेल्या अधिकारातील काही अधिकार त्यांनी वाटले आहेत. त्यामुळे अध्यक्षांचे अधिकार असून त्यांना रविवारीच निलंबित केले आहे. पटेल कार्यकारी अध्यक्ष असले तरी तुम्ही नेमणुका करू शकत नाही.
पक्षातून निलंबित केल्यानंतर नियुक्त्या का केल्या? पक्षाध्यक्षाला लपवून आपण नऊ आमदारांना पक्षविरोधी कारावाया करण्यास प्रवृत्त केले त्याबद्दल पटेल यांना निलंबित केले आहे. सर्वच नेते अध्यक्ष आहेत आमचे नेते आहेत असे ते सांगत होते. प्रश्न उरतो तो नैतिकतेचा. मग पटेल आणि तटकरे यांच्यावर केलेली कारवाई तुम्ही मान्य करणार आहात का? जयंत पाटील यांची नियुक्ती पवार यांनी केली आहे. कायदेशीर कारवाई करणार नाही असे एकजण म्हणत होते, असे काहीजण म्हणतात मग त्यांचे नाव का घेत नाही? त्यांचे नाव शरद पवार आहे. जयंत पाटील आणि शरद पवार यांनी एकत्र बोलून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कायदेशीर अज्ञानातून घेतलेल्या निर्णयांना काहीच अधिकार नाहीत.
तटकरे, पटेल यांची हकालपट्टी
सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष पवार यांना पत्र लिहिल्यानंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पदावरून हटविण्यात आले. ही कार्यवाही रविवारी (ता. २) करण्यात आल्याचे पत्र सोमवारी प्रसिद्धीस दिले. दरम्यान सुळे यांच्या पत्रानंतर पटेल आणि तटकरे यांचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेत हक्कालपट्टी केली असे जाहीर करण्यात आले.
Join Our WhatsApp Community