MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याकरता उरले शेवटचे सात दिवस

394
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी अर्ज करू शकता १० जुलैपर्यंत... उरले शेवटचे सात दिवस
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी अर्ज करू शकता १० जुलैपर्यंत... उरले शेवटचे सात दिवस

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १००९३५ नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी ७३,१५१ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. म्हाडाच्या घरासाठी २२ मे, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. यात आतापर्यंत उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांकरीता २४,७२४ अर्ज प्राप्त झाले आहेत, अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांकरीता ५१,१९८ अर्ज प्राप्त झाले आहेत, मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांकरीता ७,२८६ अर्ज प्राप्त झाले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २,०७४ अर्जदारांनी अर्जं केला आहे. तसेच प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत १९४७ सदनिकांसाठी १५,६५३ अर्जं प्राप्त झाले असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे.

मुंबई मंडळातर्फे राज्यातील नागरिकांना सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेता यावा याकरिता नुकतेच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार अर्जं नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरण्याकरिता १० जुलै, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अर्जदार १० जुलै रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील तर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील. तसेच १२ जुलै, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. येत्या १७ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ जुलै, २०२३ रोजी दुपारी ०३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. २४ जुलै, २०२३ रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

(हेही वाचा – Jitendra Awhad : पदे वाटायचा अधिकार किटी पार्टीला नाही : जितेंद्र आव्हाड)

कोणी व्यक्ती/दलाल काही प्रलोभने देऊन फसवणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ यांचे कार्यालयास कळवावे. अर्ज करतेवेळी अर्जदारांना येणाऱ्या अडचणींच्या मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.