मुंबईत कोरोना रुग्णांचा उच्चांक! रविवारची रुग्ण संख्या ३,७७५!

कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 37 लाख 11 हजार 103 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

154

मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी, 20 मार्च रोजी 2 हजार 982 रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी तब्बल 3,775 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित

मुंबईत सर्वाधिक 3,775 रुग्ण आढळून आल्याने, कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 62 हजार 654 वर पोहोचला आहे. 10 जणांचा मृत्यू झाल्याने, मृतांचा आकडा 11 हजार 583 वर पोहचला आहे. तर 1,647 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा 3 लाख 26 हजार 708 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 23 हजार 448 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 106 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 40 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 316 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 37 लाख 11 हजार 103 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! तिरुपती बालाजी मंदिरातील मानवी केसांची चीनकडून तस्करी!)

हे विभाग आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट 

मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे, या विभागात महापालिकेकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.