उद्धव ठाकरे यांनी बोलावली सर्व नेत्यांची बैठक

263
उद्धव ठाकरे यांनी बोलावली सर्व नेत्यांची बैठक

महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ हा दिवस फार मोठ्या घडामोडींमुळे महत्वाचा ठरला. रविवार २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तसेच त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी रविवार (२ जून) युती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार, ४ जुलै) एक बैठक बोलावली आहे.

(हेही वाचा – एनआयएने केला ‘इसिस’च्या महाराष्ट्र मॉड्युलचा पर्दाफाश)

या बैठकीसाठी सर्व आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) इथे ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बातचीत करुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) राहायचं की एकला चलो रेची भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया, असा सूर मनसेच्या बैठकीत उमटला. राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे, कशी लढायची यावर त्यांनी नेत्याचं मत जाणून घेतलं. यावेळी उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. यावर राज ठाकरेंनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.