रविवारी (२ जुलै) दुपारपासून राज्यातील राजकारणाने पूर्ण ३६० अंशांची कलाटणी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ होत असली तरी सत्तेच्या केंद्रभागी त्याचे हादरे बसायला सुरुवात झाली आहे.
मुंबईत आज म्हणजेच मंगळवार ४ जुलै रोजी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. अजित पवार यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. मंत्रालयासमोरचं हे कार्यालय असेल. या कार्यालयातून राष्ट्रवादीचा गाडा हाकण्यात येणार आहे.
(हेही वाचा – व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ७ रुपयांची वाढ)
त्यातच अजित पवारांकडून राज्यातील सगळ्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करायला सुरुवात झाली आहे. आपल्यासोबत येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक जिल्ह्यात बैठका घेऊन अध्यक्ष निर्णय कळवणार आहेत. मात्र ५ तारखेच्या बैठकीसाठी अजित पवारांकडून हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अजित पवारही स्वतःच्या संघटना मजबुतीसाठी मैदानात उतरले आहेत.
याधी शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत फूट पडल्यानंतर मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांमध्येच शिवसेनेच्या शिंदे गटाचे देखील अशाच प्रकारे नवीन कार्यालय सुरू झाले होते. त्यामुळे मंत्र्यांसाठी राखीव असलेले बंगले हे सध्या राजकीय पक्षांचे कार्यालय म्हणून अधिकृत उघडले जात आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community