उद्योगपती अनिल अंबानींच्या पत्नी टीना अंबानी यांना आज, मंगळवारी (४ जुलै) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीने सोमवारी (३ जुलै) फेमा प्रकरणी अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर आज टीना अंबानी यांची चौकशी करण्यात आली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून अंबानी कुटुंबाची चौकशी करण्यात येत आहे.
फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. येस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी २०२० मध्ये ईडीसमोर हजर झाले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने ४२० कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अंबानींना दिलासा दिला होता. तसेच आयकर विभागाला अनिल अंबानींवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे सांगितले होते. मार्च २०२० मध्ये, अनिल अंबानी यांना ईडीने येस बँकेच्या एक्सपोजरच्या संदर्भात एडीएजीच्या स्थानाबाबत चौकशी केली होती.
(हेही वाचा – मुंबई महापालिकेत प्रशासक; पण शासक कुठे?)
रिलायन्स समूहाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, एडीएजी आणि येस बँक यांच्यातील सर्व व्यवहारांमध्ये कायद्याचे आणि आर्थिक नियमांचे पालन केले आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि इतरांच्या संबंधात, अंबानी म्हणाले होते की, रिलायन्स समूहाचा कपूर, त्यांची पत्नी किंवा मुली किंवा त्यांच्याद्वारे नियंत्रित कोणत्याही संस्थेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क नाही. दरम्यान आता निता अंबानी यांची देखील ईडीच्या कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community