अजित पवारांनी केलेल्या बंडामागे शरद पवारच असल्याची शक्यता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे मंत्री पदासाठी अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत त्यामुळे हे सगळं संशयास्पद असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात या सगळ्याची सुरूवात शरद पवारांनी केली, आता शेवटही त्यांच्यावरच होतोय असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या प्रसंगावर मी मेळाव्यात बोलेल असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात अशा प्रकारांची सुरूवात पवार साहेबांनीच केली आणि शेवटही त्यांच्यावरच होतोय असे राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा – पक्ष फाटा-फुटीनंतर राज्याच्या गृह खात्यावर वाढला ताण)
महाराष्ट्रात जे चालले आहे ते अत्यंत किळसवाणे राजकारण चालले आहे. कोणाचे आमदार कोणासोबत आहेत? हेच कळायला मार्ग नाही. त्याच सोबत घड्याळाने काटा काढला? की काट्याने घड्याळ काढलं? असा मिश्किल सवालही उपस्थित पत्रकारांना केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community