NCP : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शुन्यच

364
NCP : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शुन्यच
NCP : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शुन्यच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह अजित पवार हे राज्यातील शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर खरी राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी घेतलेली मंत्रीपदाची शपथ आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांमुळे खरी राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तरी मुंबईत याचा काहीही परिणाम होणार नसून अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतानाही मुंबईत हा पक्ष शुन्यच होता. त्यामुळे फुटल्यानंतरही या पक्षाचा काहीही परिणाम मुंबईत दिसून येत नाही आणि येणारही नाही, असे बोलले जात आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक हे २०१७च्या निवडणुकीत निवडून आले होते. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढला होता. त्यामुळे आजवर दोन अंकी सदस्य संख्या गाठणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतंत्र लढताना केवळ ९ जागा निवडून आणता आल्या होत्या. यात एकमेव पुरुष आणि आठ महिला नगरसेवक होते. त्यातही ६ नगरसेवक हे मुस्लिम आणि तीन नगरसेविका या मराठी होत्या. विशेष म्हणजे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदा दोन भाऊंवर होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रवक्त असलेल्या नवाब मलिक यांच्याशी न पटल्याने माजी आमदार सचिन अहिर आणि माजी खासदार संजय पाटील यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर परंतु २०१७च्या निवडणुकीत पक्षाचे तत्कालिन मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आणले. त्यात आपल्या दोन भाऊ व बहिणीलाही त्यांनी निवडून आणले. तर अणुशक्ती नगर विधानसभेतून नादिया यांना निवडून आणले.

परंतु पुढे नादिया यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला, तर नाझिया या जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरल्या, तर धनश्री भरडकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे येणाऱ्या आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुंबईत कोणीही नेता आहे. नवाब मलिक हे अटकेत असल्याने प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांनी मुंबईची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्यानंतर मुंबई अध्यक्षपदासाठी महापालिकेच्या माजी गटनेत्या राखी जाधव आणि श्री सिध्दीविनायक न्यासाचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांची कार्याध्यक्षपदी निवड करत दोघांनाही प्रत्येकी तीन जिल्हे विभागून दिले. परंतु आता अजित पवार यांच्यासोबत काही आमदार बाजुला झाल्याने त्यांच्यासोबत नरेंद्र राणेही गेले असून राखी जाधव या सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहिल्या आहेत.

(हेही वाचा – Raj Thackeray : भुजबळ आणि पटेल अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत; राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय)

राखी जाधव यांच्यावर दोन भाऊंचा आशिर्वाद होता. परंतु या दोघांनी शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केल्यानंतर जाधव यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहत आहे. पण राखी जाधव यांच्याकडे मुंबईत पक्षाला मजबूत करण्याची क्षमता नसून २०१७च्या निवडणुकीत त्या केवळ साडेसातशे मतांनी निवडून येता आले. त्यामुळे स्वत:च्या मतदार संघातच त्या असुरक्षित असून त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे आजवर आपल्या मामांची मदत घेऊन त्यांनी महाडमधील मतदारांची मते स्वत:कडे वळवून निवडून येत होते. परंतु आता त्यांचे मामा आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जाधव यांच्यासाठी आपल्या प्रभागात निवडून येण्याचेच मोठे आव्हान राहणार आहे. त्यातच नरेंद्र राणे हेही दोन भाऊंच्या तालमीत वाढलेले आहे. त्यामुळे दोन्ही भाऊंचा प्रभाव राणे यांच्यावर असल्याने मुंबईत जर अजित पवार यांनी त्यांना मुंबई अध्यक्ष बनवल्यास राणे हे चांगल्याप्रकारे पक्षाची बांधणी करु शकतात,असेही काही पक्षांच्या लोकांकडून बोलले जात आहे. दोन भाऊंमुळे या पक्षाची मुंबईत ताकद होती, परंतु ते गेल्यानंतर नवाब मलिक यांनी आपली ताकद दाखवून दिली. परंतु आता तेही अटकेत असल्याने व पक्षापासून लांब असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुंबईत शुन्य झाला असून राणे किंवा जाधव यांना मुंबईत शुन्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवावी लागेल, असेही कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.