राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर

216
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे काल म्हणजेच मंगळवारी (४जुलै) संध्याकाळी नागपुरात आगमन झाले. राष्ट्रपती मुर्मू ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.

द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदींनी स्वागत केले.

(हेही वाचा – देशातील अनेक राज्यांमध्ये ८ जुलैपर्यंत पडणार मुसळधार पाऊस)

राष्ट्रपती बुधवारी ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या दहावा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत.त्याच दिवशी दुपारी भारतीय विद्या भवनतर्फे निर्माण करण्यात आलेल्या रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ६ जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील.त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.