महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ हा दिवस फार मोठ्या घडामोडींमुळे महत्वाचा ठरला. रविवार २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तसेच त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी रविवार (२ जून) युती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच बुधवार ५ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने आपल्या खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. एकूण ५३ आमदारांपैकी ज्या गटात सर्वाधिक आमदार असतील, तोच गट आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा घटनात्मक अधिकार सांगू शकेल. त्यामुळे खरी राष्ट्रवादी कोणाची अशी चर्चा रंगू लागली आहे.
छगन भुजबळ यांच्या प्रमाणेच अजित पवारांच्या गटात असलेल्या धनंजय मुंडे यांनी देखील भाषण केले आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी टीका सहन केली पण कधी सत्य बोलले नाहीत, असे धनंजय मुंडे म्हणाले.
(हेही वाचा – NCP Crisis : शरद पवार आमच्यासाठी श्रद्धास्थानी; आमच्या विठ्ठलाला … – छगन भुजबळ)
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
अजित दादा आता तरी मन मोकळं कराच अशी साद धनंजय मुंडेंनी अजित पवारांना घातली. तसेच अजित पवारांनी ज्या-ज्या गोष्टी शरद पवार साहेबांच्या शब्दाखातीर केल्या, त्या स्वत:च्या सावलीला देखील त्यांनी कळून दिल्या नाहीत. अजित दादांनी टीका सहन केली पण कधी सत्य बोलले नाही. आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला.
पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, आज या व्यासपीठावर बोलताना माझ्या डोळ्यात पाणी दिसत नसेल, पण माझं मनं रडतंय. अजितदादांना किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील. पण ते कधीही काहीही बोलले नाहीत. त्यांनी सगळं सहन केलं. अजित दादांना सर्वात जास्त वेदना सहन केल्या आहेत, असं म्हणताना धनंजय मुंडे गहिवरले.
वांद्रे येथील एमईटी कॉलेच्या मैदानावर अजित पवार गटाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आतापर्यंत ३२ आमदारांनी उपस्थिती लावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community