राष्ट्रवादीने दोनदा संधी गमावली, नाहीतर आज महाराष्ट्राला दोनवेळा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्याचे पहायला मिळाले असते असे शल्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना राष्ट्रवादीला २००४ मध्ये संधी आली होती तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडण्यात आले नाहीतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री राज्यात राहिला असता. २०२२ मध्येही आपण ही संधी गमावल्याचे अजित पवार म्हणाले. वांद्रे येथील पक्षाच्या बैठकीत अजित पवार बोलत होते.
वसंत पाटील यांचे सरकार बाजूला सारले आणि आपले सरकार स्थापन केले. शरद पवारांनी अनेक पक्ष काढले आणि त्यांना लोकांनी राज्याच्या राजकारणात योग्य स्थान दिले. त्यानंतर १९८६ ला समाजवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केला मात्र तेव्हा त्यांना पद मिळाले नाही, पण त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळाले. केंद्रात मंत्रिपद मिळाले. १९७८ पासून शरद पवारांनी लोकांनी साथ दिली पण प्रत्येकाचा एक काळ असतो असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे मी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही असे अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा – NCP Crisis : साहेब वय झालं, कधी थांबणार? अजित पवार यांचा शरद पवारांना थेट सवाल)
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, “विरोधकांमध्ये बसून काही निर्णय होत नाही. सत्तेमध्ये काम करून लोकांचे प्रश्न सोडवता येत असतील तर का सोडायचे नाही? म्हणून आम्ही हा लोकांच्या हितासाठी निर्णय घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community