एक पाकिस्तानी तरुणी सहज भारतात राहायला येते… एक महिना आरामात राहते… आणि देशातील सुरक्षा यंत्रणाना काहीच माहित नसने… यामुळे देशातील कार्यक्षम सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह तर निर्माण झालेच आहे… पण देशाची सुरक्षा देखील धोक्यात असल्याचे दिसून येते.
प्रियकरासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी तरुणीला नोएडा पोलिसांनी हरियाणातील बल्लभगड येथून अटक केली आहे. पबजी (PUBG) खेळताना ती महिला एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली होती, त्यानंतर ती तिच्या पहिल्या पतीला सोडून ४ मुलांसह भारतात आली होती. ग्रेटर नोएडाचे डीसीपी शाद मियाँ खान म्हणाले की, सीमा नावाची ही महिला मूळची पाकिस्तानच्या खैरपूर सिंध प्रांतातील आहे. ती कराचीत राहत होती. महिलेचा प्रियकर सचिन आणि त्याचे वडील नेत्रपाल यांनाही अटक करण्यात आली आहे. यावर बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सुरेश कुलकर्णी म्हणाले की, त्या महिलेचे अशाप्रकारे देशात येणे, नक्कीच धोकादायक बाब आहे.
तिचा सर्वच तपास करण्यात येत असून कायदेशीर पद्धतीने सर्वच कारवाई करण्यात येत आहे. देशांतर करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तिची सर्वच पातळीवर सर्वच सुरक्षा एजन्सीकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान सीमाने पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे तपासात समोर आले आहे. २०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान नवरा कामानिमित्त सौदीला गेला असताना सीमा आणि सचिन पबजी (PUBG) गेमच्या माध्यमातून संपर्कात आले. यानंतर तिने इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानातून भारतात येण्याचा मार्ग शोधला. तिला नेपाळमध्ये उत्तम पर्याय सापडला. २०२३ मध्ये दोघेही काठमांडूमध्ये ७ दिवस एकत्र राहिले. यानंतर सीमा पुन्हा नेपाळचा टुरिस्ट व्हिसा घेऊन ४ मुलांसह नेपाळला आली. तिने पोलिसांना सांगितले- तिला सचिनसोबत भारतात कायमचे शिफ्ट व्हायचे आहे. मार्चमध्ये सचिन नेपाळमध्ये एकटा भेटायला आला होता. सचिनसोबत राहण्याची चर्चा होती. यानंतर हे लोक नेपाळमध्येच एक-दोनदा भेटले.
(हेही वाचा – NCP Crisis : …नाहीतर आज राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री असता; अजित पवारांनी साधला शरद पवारांवर निशाणा)
सीमाचे पहिले लग्न २०१४ मध्ये झाले होते. सीमाला पती गुलाम हैदरपासून ४ मुले आहेत. तो फरशी बसवण्याचे काम करतो. सीमाचा एक भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. याशिवाय तिच्याजवळून २ व्हिडिओ कॅसेट, ४ मोबाइल, १ सिम, १ तुटलेला मोबाइल, ४ जन्म प्रमाणपत्रे, ३ आधार कार्ड, पाकिस्तान सरकारचे राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरण मंत्रालयाची अंतर्गत यादी, ६ पासपोर्ट, ५ लसीकरण कार्डे आणि पोखरा (काठमांडू) ते दिल्लीसाठी १ बस तिकीटही जप्त करण्यात आले आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनला पत्र पाठवून पाकिस्तानी महिलेच्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. आयबी, एटीएसलाही पत्रे लिहिली आहेत. मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पाकिस्तानी महिला सीमाचे नोएडा येथे राहणाऱ्या सचिनसोबत ऑनलाइन गेमच्या माध्यमातून प्रेमसंबंध होते. दोघेही ३ वर्षे एकमेकांशी बोलले. सीमा नेपाळमार्गे ४ मुलांसह नोएडा गाठली. दोघेही दीड महिन्यांहून अधिक काळ पती-पत्नीसारखे राहत होते. मात्र, ही माहिती वकिलामार्फत पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा तेथे फक्त सचिन आढळून आला. तर महिला मुलांसह तेथून निघून गेली होती. यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community