ED : कोविड सेंटर घोटाळा : कंत्राटदारांच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे

245
ED : कोविड सेंटर घोटाळा : कंत्राटदारांच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे
ED : कोविड सेंटर घोटाळा : कंत्राटदारांच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे

कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीने आता कंत्राटदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. बुधवारी ईडीच्या पथकाने मुंबईत ८ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ही छापेमारी कोविड सेंटर घोटाळा संबंधी असलेल्या कंत्राटदारांच्या घरावर आणि कार्यालयावर करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी छापेमारी करून शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांची चौकशी करून त्याचा जबाब नोंदविण्यात आला, तसेच काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची देखील ईडीने चौकशी केली आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar : चिन्ह जाणार नाही, मी ते जाऊ देणार नाही…; शरद पवारांची कार्यकर्त्यांना ग्वाही)

ईडीने आता कोविड काळात महानगरपालिकेकडून जम्बो सेंटर तसेच कोविड सेंटर संदर्भात कंत्राटे देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडे आपला मोर्चा वळवला आहे. बुधवारी या संदर्भात ईडीच्या विविध पथकांनी मुंबईत कंत्राटदारांच्या घरी आणि कार्यालय अशा एकूण आठ ठिकाणी छापे टाकून काही महत्वाची कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. लवकरच या कंत्राटदारांना ईडीकडून समन्स बजावले जाऊन त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. ईडीने गेल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेला पत्र पाठवून कोविड संदर्भात खर्चाची इत्यंभूत माहिती तसेच कागदपत्रे मागविण्यात आली होती, या कागदपत्रांच्या आधारे छापे टाकण्यात आले असल्याचे समजते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.