महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळाची भेट

265
महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळाची भेट
महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळाची भेट

मुंबई हे जगभरातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले महानगर असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना प्रशंसनीय आहेत. विविध आपत्तींच्या काळात आणि आपत्तीपूर्वी केली जाणारी कामे, उपाययोजना आम्ही ऑस्ट्रेलियातही अवलंबू शकतो, अशी भावना ऑस्ट्रेलियाचे आपत्कालीन व्यवस्थापनविषयक केंद्रीय मंत्री आणि सिनेटर मुरे वॅट यांनी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन येथील कामकाज, तंत्रज्ञान, उपाययोजना आदींची माहिती ५ जुलै २०२३ रोजी जाणून घेतली त्यावेळी ते बोलत होते.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत करत मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन आणि विविध उपाययोजनांची माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचे आपत्कालीन व्यवस्थापनविषयक मंत्री मुरे वॅट यांच्यासह उप प्रमुख जेसिका मिशेल, माध्यम सल्लागार ब्रॉक टेलर, सहायक सचिव लॉरा टिम्मीन्स, गृह विभागाचे समुपदेशक ख्रिस वॉटर्स, कृषी विभागाचे समुपदेशक किरण कॅरामिल, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत मायकेल ब्रॉन, उप वाणिज्यदूत जोएल ऍडसेट, वरिष्ठ संशोधन अधिकारी श्वेता प्रभाकर यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग) महेश नार्वेकर आणि संबंधीत अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : आता भंगार विक्रेते महापालिकेच्या रडारवर)

महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने महापूर, भूस्खलन, आगीच्या घटना, दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट, कोविड काळात करण्यात आलेल्या कार्यावर आधारीत चित्रफित यावेळी दाखवण्यात आली. ही चित्रफित पाहून ऑस्ट्रेलियाचे शिष्टमंडळ भारावून गेले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.