आता मेसेजला रिप्लाय देत बसू नका, हे काम तुमच्यासाठी एआय करेल. कसे ते वाचा

282
आता मेसेजला रिप्लाय देत बसू नका, हे काम तुमच्यासाठी एआय करेल. कसे ते वाचा
आता मेसेजला रिप्लाय देत बसू नका, हे काम तुमच्यासाठी एआय करेल. कसे ते वाचा

गुगलने आपल्या मेसेजेसच्या ऍपमध्ये एक नवीन ए आय (AI) फिचर ऍड केले आहे. या फिचरचा उपयोग सध्या काही निवडक बीटा युजर्स करू शकतात. हे फिचर तुम्हाला आलेल्या मेसेजेसना काय रिप्लाय द्यावा याचा पर्याय सुचवेल. त्याप्रमाणे तुम्ही मेसेजेसना रिप्लाय करू शकता. ए आय (AI) म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशी जोडलेले टूल्स आणि फीचर्स सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहेत. गुगलपासून ते मायक्रोसॉफ्ट पर्यंतच्या मोठमोठ्या कंपन्या या तंत्रज्ञानाच्या युगात ए आय (AI) द्वारे घडणाऱ्या नवनवीन बदलांवर काम करत आहेत. या बदलांना आपल्या प्रॉडक्ट्समध्ये सामील करून घेत आहेत.

गुगलने आपल्या मेसेजिंग ऍपमध्ये ए आय (AI) चे मॅजिक कंपोज हे फिचर ऍड केले आहे. हे फिचर तुम्हाला येणाऱ्या मेसेजेसना रिप्लाय करण्यासाठी पर्याय लिहून पाठवते जेणेकरून तुम्हाला आपल्या मेसेजेसना रिप्लाय करणे सोपे जाते. जर तुम्हाला टेक्स्ट मॅसेज करायला आवडत असेल तर या फिचरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सध्या आपल्या फोनमध्ये गूगल मेसेजिंग ऍप वापरणारे युजर्स जे बीटा प्रोग्रामिंगचा भाग आहेत. अशा युजर्सनाच या फिचरचा एक्सेस गुगलने दिला आहे. जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हे फिचर वापरायचे असेल तर गूगल मेसेजेस बीटा प्रोग्रामिंगसाठी साईन अप करावे लागेल. त्याचबरोबर गूगल वनची मेंबरशीप घेणाऱ्यांना हे फिचर वापरण्यासाठी प्राथमिकता दिली जाईल असेही गुगलने सांगितले. आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये यू एस (US) सिमकार्ड वापरणाऱ्या युजर्सना हे फिचर वापरायला मिळत आहे.

(हेही वाचा – APMC : टोमॅटोची आवक घटली, किलोचा दर पोहोचला ‘इतक्या’ रूपयांवर)

आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये हे फिचर एनेबल करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या फोनमध्ये गूगल मेसेजिंग ऍप डाउनलोड किंवा अपडेट करावे लागेल. त्यानंतर कोणतेही आरसीएस (RCS) कॉन्व्हर्सेशन किंवा चॅट ओपन करा किंवा नवे चॅट सुरू करा. त्यानंतर ‘मेसेज सजेशन्स’वर टॅप करा, मग ‘ट्राय ईट’ वर टॅप करा. या फीचरमध्ये तुम्हाला तुमच्या मेसेजेसना रिप्लाय करायला बरेचसे पर्याय मिळतील. पण काही एक्स्पर्ट्सचे म्हणणे आहे की लोकांच्या प्रायव्हसीच्या दृष्टीने हे फिचर धोकादायक असू शकते. कारण एन्ड टू एन्ड असूनही हे लोकांचे मेसेज वाचू शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.