चुनभट्टीच्या ‘त्या’ बांधकामाला एसआरएचे स्थगितीचे आदेश

224
चुनभट्टीच्या 'त्या' बांधकामाला एसआरएचे स्थगितीचे आदेश

चुनाभट्टी मधील राहुल नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या कामांत बांधकामाच्या जवळील जमीन खचण्याची घटना घडली. या घटनेनंतर नियोजन प्राधिकरण असलेल्या एसआरए प्राधिकरण मार्फत संबंधित बांधकामाला त्वरित काम थांबण्याची (स्टॉप वर्क नोटीस) नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या जागेचा वापर सुस्थितीत असल्याच्या स्ट्रकक्चरल ऑडीटचा अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित बांधकाम व्यवसायिकाला दिल्या आहेत.

पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव- चुनाभट्टी भागात सुरू असलेल्या एसआरए पुनर्वसन योजना अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामात बुधवारी (५ जुलै) जमिनीचा भाग खचून त्या नजीकच्या जमिनीचा भाग खचून त्यावर उभ्या करण्यात आलेल्या काही दुचाकी आणि चार चाकी वाहने त्यात पडल्या. रस्त्याच्या ३० ते ४० फुट खोल खचलेल्या या भागाची पाहणी एसआरए आणि महापालिका एल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पणे केली.
त्यानुसार एसआरएने संबंधित बांधकाम व्यवसायिक आणि वास्तुविशारद यांना नोटीस बजावून काम थांबवण्याच्या सूचना अर्थात स्टॉप वर्क नोटीस बजावली आहे.

(हेही वाचा – महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळाची भेट)

एसआरएने बांधकामाला परवानगी देताना, त्याठिकाणी भूस्खलन, पाणी साचणे इत्यादींमुळे संभाव्य कोसळणे तथा नुकसान टाळण्यासाठी सर्व सावधगिरीचे उपाय करण्याची सूचना केली होती. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकामाच्या ठिकाणी सामान्य देखभाल, आणि संरचनात्मक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपचारात्मक कारवाई करण्याची आणि पुरेशी खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. जेणेकरून बांधकामाच्या ठिकाणी कोसळून दुर्घटना होण्याचा प्रकार टाळता येईल, या सूचनांचे स्मरण करून देत एसआरएने त्यांना त्वरित बांधकाम थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत.

या दुर्घटना ग्रस्त भागातील बांधकामाची कामे, विजेच्या तारांमधील गळती तथा शॉट सर्किट टाळण्यासाठी आणि विजेचे धक्के, आगीचे धोके, मानवी जीवितहानी इत्यादी टाळण्यासाठी त्वरित काम थांबविण्याच्या सूचना देतानाच पुढे या भागाचा जिईओ तांत्रिक सल्लागार तथा महापालिका नगरपालिका संरचनात्मक अभियंता यांनी जारी केलेले स्ट्रक्चरल ऑडिटच्या माध्यमातून स्थिरता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच जमिनीचा खचलेला भाग सुरक्षित आणि सुस्थितीत आणण्याचाही सूचनाही देण्यात आल्या आहेत. जेणेकरून भविष्यात बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडू नये. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ही काम थांबवण्याची सूचना तुम्हाला जारी केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.