राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणजेच बुधवार ५ जुलै रोजी एक महत्त्वाची बैठक घेतली. शिंदे गटाचे सर्व आमदार या बैठकीत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवार (६ जुलै) रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली. मुंबईमधील देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन केले.
केंद्रीय मंत्री मा. श्री. @RamdasAthawale जी यांनी आज देवगिरी या शासकीय निवासस्थानी माझी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/3davwSL2sY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 6, 2023
(हेही वाचा – ‘वित्त’ विभागामुळे सेना आमदारांचे पित्त खवळले?)
अजित पवार भाजप शिवसेना आणि रिपाइं महायुती सोबत आल्यामुळे आमच्या महायुतीची ताकद अधिक वाढली आहे. राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपण आज अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती रामदास आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. अजित पवार आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणताही वाद नसल्याचे पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले.
यावेळी रिपाइंचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, युवक आघाडी मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते, महिला नेत्या ऍड. आशा लांडगे, सोना कांबळे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community