राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच मुंबई मध्ये आपल्या पक्षाचा एक मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
राज-उद्धव या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटासोबत युती करावी, असा सूर मनसेच्या बैठकीत दिला होता. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे कळते. राज्यातील राजकीय भूकंपानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीवर राज ठाकरे बोलणार का? यावरही सगळ्यांच लक्ष असणार आहे.
दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे राज ठाकरेंचा चिपळून दौरा पुढे ढकलला असल्याचे जाहीर केले आहे. ८ जुलैला राज ठाकरेंचा चिपळूणचा दौरा होणार होता.
Join Our WhatsApp Community