Supriya Sule : अजित पवारांसोबत थेट संघर्ष होणार का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले…

188

महाराष्ट्रात घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे भवितव्य काय असणार हा विषय केंद्रस्थानी आहे. भविष्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट संघर्ष होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट कॅमेरावर स्पष्ट मत मांडले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असे १० वर्षांत काय १० जन्मात कधीच घडणार नाही, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे यावर मतप्रदर्शन केले. त्यामुळे यावरून आता पुन्हा नव्याने तर्क वितर्क लढवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्याचा हा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित होत आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांना सोबत घेऊन पक्षावर दावा केल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केली असताना काही दिवसांतच अजित पवार यांनी बंड करून पक्षाचं ताब्यात घेतला आहे. अशा वेळी दोन्ही गटाचे नेते भविष्यात आमने सामने येतील, अशी चर्चा सुरु झाली असताना त्यावर सुप्रिया सुळे यांचे मत विशेष अधोरेखित होत आहे.

(हेही वाचा एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यांकडे दिली पाच आमदारांची जबाबदारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.